पटना - आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केलेल्या 13 डॉक्टरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये बिहारच्या शांती रॉय यांचा समावेश आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा घेऊया.
डॉ शांती राय ह्या गोपलगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी 1962 साली पटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (पीएमसीएच) येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. पीएमसीएचमधील स्त्री आणि प्रसूती विभागध्यक्षपदी काही काळ काम केले आहे. आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. पाटणामध्ये 'सर्वेश्रेष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ' हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे.