नवी दिल्ली - हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरातील वातावरण तापले आहे. हाथरस प्रकरणी संपूर्ण देश आणि राजकीय पक्ष पीडित कुटुंबीयांच्या बाजूने आहेत. राहुल-प्रियांका गांधींनंतर अनेक राजकीय पक्षांनी पीडित कुटुबांची भेट घेतली आहे. आज आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह पीडित कुटुबांची भेट घेण्यासाठी हाथरसला पोहचले. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी संबधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आम आदमी पार्टी प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या घटनेबद्दल उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
'त्याच शाईने आदित्यनाथ यांच्या गुंडाराज अन् काळ्या कारनाम्यांचा अंत लिहिला जाईल'
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह पीडित कुटुबांची भेट घेण्यासाठी हाथरसला पोहचले. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाही फेकल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी संबधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यास पोहोचले असता, त्यांच्यावर शाई फेकून भाजपाने आपली काळी बाजू उघड केली आहे. संजय सिंह यांच्यावर जी शाई फेकली गेली आहे. त्याच शाईने योगींच्या काळ्या कारनाम्यांचा काळा इतिहास लिहिला जाईल, असे आम आदमी पार्टी उत्तर प्रदेशने म्हटलं आहे. याच शाईने आदित्यनाथ यांच्या गुंडाराज अन् दहशतवादाचा अंत लिहिला जाईल
संजय जी, तुम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या अन्याय आणि अत्याचाराविरूद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी तुमच्याविरोधात 14 एफआयआर दाखल केल्या. तसेच कार्यालय सील केले. मात्र, तुम्हाला अटक करण्याची हिम्मत न झाल्याने आज तुमच्यावर हल्ला केला. हा हल्ला यूपी सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा पराभव आणि घृणास्पद कामगिरी दर्शवत आहे. त्यांच्या या कारवाईवरून स्पष्ट होते की, तुम्ही योग्य मार्गावर आहात, असे टि्वट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.