नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 83 हजार 809 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,054 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 80 हजार 776 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 49 लाख 30 हजार 237 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 90 हजार 61 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 38 लाख 59 हजार 400 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.