महाराष्ट्र

maharashtra

हिंदुस्थान एरॉनॉटिक्सने घेतले ३००व्या लढाऊ ध्रुव हेलिकॉप्टरचे उत्पादन

By

Published : Sep 29, 2020, 5:52 PM IST

300व्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या उत्पादनाचे प्रमाणपत्र हे जी. व्ही. एस भास्कर यांनी हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. शर्मा यांनी दिले. यावेळी विमान वाहतूक गुणवत्ता महासंचालनालयाचे (डीजीएक्यूए) अधिकारी हे एचएएलच्या हेलिकॉप्टर डिव्हिजनमध्ये होते.

लढाऊ ध्रुव हेलिकॉप्टरचे घेतले उत्पादन
लढाऊ ध्रुव हेलिकॉप्टरचे घेतले उत्पादन

बंगळुरू -हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि. कंपनीने हलक्या वजनाचे ३००व्या ध्रुव या लढाऊ अद्ययावत लाईट हेलिकॉप्टर (एएलएच) बंगळुरूमध्ये उत्पादन घेतले आहे. ही माहिती हिंदुस्था एअरोनॉटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी दिली.

एरॉनॉटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन म्हणाले, की एएलएचची जागतिक दर्जाची कामगिरी आहे. एएलएच १ ते मार्क-४ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे देशात दर्जेदार आणि स्वदेशी हेलिकॉप्टरची निर्मिती करणे शक्य झाले आहे.

300व्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या उत्पादनाचे प्रमाणपत्र हे जी. व्ही. एस भास्कर यांनी हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. शर्मा यांनी दिले. यावेळी विमान वाहतूक गुणवत्ता महासंचालनालयाचे (डीजीएक्यूए) अधिकारी हे एचएएलच्या हेलिकॉप्टर डिव्हिजनमध्ये होते.

एएलएचच्या ३००व्या हेलिकॉप्टरचे उत्पादन हे हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या क्षमतेची चाचणी आहे. ही क्षमता अनेक कर्मचारी आणि सहकार्याने तयार करण्यात आली आहे. ग्राहककेंद्रित सेवा एएलचकडून देण्यात येत आहे. एएलएचची २ लाख ८० हजार विमान उड्डाणांची तासे हे त्याची गुणवत्ता दर्शवितात, असे भास्कर यांनी सांगितले.

सध्या एचएएलकडून सैन्यदलाला ७३ एएलएचएस, भारतीय नौदलाला १६ आणि भारतीय तटरक्षक दलाला १६ पुरविण्यात येणार आहेत. तर यापूर्वीच ३८ एएलएचचे उत्पादन घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details