नव्या शिक्षण प्रणालीचे भारतीयकरण करणे ही काळाची गरज - मोहन भागवत
विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहण देण्याची गरज आहे. इंग्रजी शिक्षणानेच चांगला पैसा मिळेल ही विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली- नव्या शिक्षण प्रणालीचे भारतीयकरण करणे ही काळाची गरज आहे. तसेच इंग्रजी शिक्षणाणेच चांगल्या पैशाची नोकरी मिळेल ही विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. शिक्षा संस्कृती उथ्थान न्यासने 17 ऑगस्टला आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.
जगाकडून जेवढे घेतले त्यापेक्षा अधिक देण्याची प्रवृती निर्माण होईल, असे शिक्षण देण्याची आज गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणेही महत्वाचे आहे, असे भागवत म्हणाले. देशात मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहण देण्याची गरज आहे. इंग्रजी शिक्षणानेच चांगला पैसा मिळेल ही विद्यार्थ्यांची मानसिकता बदलायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले.
नवीन शिक्षण प्रणालीविषयीही भागवत यांनी भाष्य केले. नवीन शिक्षण प्रणालीचा मी अजून पूर्णपणे अभ्यास केलेला नाही. मात्र, भारतीय मुल्यांचा या शिक्षण प्रणालीमध्ये समावेश होईल, अशी आशा करतो. कारण शिक्षणाचे भारतीयकरण करणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण कार्यक्रमाला उपस्थित होते. या दोघांनी यावेळी शिक्षण व्यवस्थेवरील आपले मत व्यक्त प्रकट केले.