महाराष्ट्र

maharashtra

ट्युमरचे अचूक निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसित, भारतीय शास्त्रज्ञांचा दावा

By

Published : Jun 10, 2020, 4:48 PM IST

Updated : Jun 10, 2020, 5:02 PM IST

ट्युमरचे अचूक निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

ग्लिओमा ब्रेन ट्यूमर
ग्लिओमा ब्रेन ट्यूमर

नवी दिल्ली - मेंदूत ट्युमरवर (गाठ) वेळेवर निदान आणि तातडीने उपचार करण्याची गरज आहे. ट्युमरचे अचूक निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान पध्दतीने साधारणपणे ब्रेन ट्यूमरचे निम्न किंवा उच्च श्रेणींमध्ये अंदाजे 98 टक्के अचूकतेचे वर्गीकरण केले आहे. या तंत्रामुळे ब्रेन ट्युमर किती मोठा आहे, हे शोधले जाईल.

ग्लिओमा ब्रेन ट्यूमर हा ग्लिअल पेशींवर परिणाम करतो. ज्या पेशी चेतासंस्थाना इन्सुलेशन प्रदान करतात. त्यामुळे ट्यूमरनुसार त्यावर योग्य निदान करणे गरजेचे आहे. उतीच्या 3 डी प्रतिमेची पुनर्रचना करण्यासाठी एमआरआय स्कॅनकडून रेडिओलॉजिस्ट खूप मोठ्या प्रमाणात डेटा प्राप्त करतात.

ट्यूमरचा आकार, पोत किंवा इतर तपशील एमआरआय स्कॅनमध्ये शोधला जाऊ शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान हा डेटा काढण्यास मदत करते. आतापर्यंत वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट ब्रेन ट्युमरवर निदान करण्याची पद्धत सुधारण्यासाठी रेडिओमिक्स पद्धत वापरत होते. परंतु, त्यांची अचूकता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानामुळे वाढली , असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

जपानमधील आयसीईएमएस जैवविज्ञानज्ञ गणेश पांडियन यांनी भारतीय डेटा वैज्ञानिक रमन यांच्या सहयोगाने हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसीत केले आहे. जेणेकरून ब्रेन ट्यूमरचे निम्न किंवा उच्च श्रेणींमध्ये अंदाजे 97.54 टक्के अचूकतेने वर्गीकरण केले जाऊ शकेल आणि त्यावर योग्य उपचार होतील.

रुग्णांच्या उपचारांची निवड पद्धत मोठ्या प्रमाणात ग्लिओमाची ग्रेडिंग निर्धारित करण्यावर अवलंबून असते. राहुल कुमार, अंकुर गुप्ता आणि हरकीरतसिंग अरोरा यांच्यासह या पथकात एमआरआय स्कॅनमधील डेटासेट वापरण्यात आले. ज्यामध्ये २१० लोक उच्च-ग्रेड ग्लिओमा आणि इतर 75 लो-ग्रेड ग्लिओमा असलेले होते.

Last Updated : Jun 10, 2020, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details