चंडीगड -सध्या देशभरात कोरोना विषाणूविरोधात लढा सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिस आपली जबाबदारी पार पाडत आहे.
भारतीय पोस्ट ऑफिसचे चंदिगड येथील ऑफिस गरजुंसाठी औषध पुरवठा करण्याचे काम करत आहे. लॉकडाऊनमध्ये कोणाच्या जीवाला हानी पोहोचू नये, यासाठी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी घरोघरी जाऊन औषधांचा पुरवठा करत आहेत.
औषंधाचा पुरवठा करण्यासाठी पोस्टाचा पुढाकार चंदिगड नॅशनल सॉर्टिंग हबचे व्यवस्थापक नीतीश कश्यप यांनी सांगितले, की चंदिगड येथील लोक आपल्या नातेवाईकांसाठी तसेच ओळखीच्या लोकांसाठी औषधी पाठवत आहे. त्यांचे पार्सल त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवण्याचे काम पोस्ट ऑफिसकडून केले जात आहे.
यामध्ये चंदीगड, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि हिमाचल येथून जास्त पार्सल पाठवण्यात येत आहेत.
दरम्यान पोस्टाचे कर्मचारी त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहेत. त्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर इत्यादी पुरवण्यात आले आहे. घरोघरी जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.