महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यातील ७ जिल्ह्यात हवामान खात्याकडून २-३ दिवसांसाठी 'रेड अलर्ट' जारी - रायगड

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरीय भागातही काही ठिकाणी मध्यम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Aug 3, 2019, 8:01 PM IST

मुंबई - भारतीय हवामान खात्याने आज (शनिवारी) राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तासांसाठी हा रेड अलर्ट असणार आहे. या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने माहिती देताना सांगितले, की पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकण भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरीय भागातही काही ठिकाणी मध्यम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. या काळात ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details