नवी दिल्ली - पाकिस्तानने १३ व्या सार्क भूलतज्ज्ञ परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला भारतासह सार्क देशांना निमंत्रित करण्यात आले होते. पण, पुलवामा घटनेचा निषेध म्हणून भारतीय डॉक्टरांनी या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
पाकिस्तानमधील भूलतज्ज्ञांच्या परिषदेवर भारतीय डॉक्टरांचा बहिष्कार
पुलवामा येथे जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. यात सीआरपीएफचे ४५ जवान हुतात्मा झाले. या संघटनेला पाकिस्तान पाठीशी घालत असल्याचा भारताचा आरोप आहे.
पाकिस्तानातील लाहोर येथे १३ व्या सार्क भूलतज्ज्ञ परिषदेचे आयोजन ७ ते १० मार्चला करण्यात आले आहे. हे आयोजन भलतज्ज्ञ आणि वैज्ञानिक समितीतर्फे करण्यात आले आहे. भारतासह इतर सार्क देशांनाही याचे निमंत्रण देण्यात आले. पण, भारतीय डॉक्टरांनी हे निमंत्रण नाकारले असून, या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
गुरुवारी काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. यात सीआरपीएफचे ४५ जवान हुतात्मा झाले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा भारताने निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते, असा भारताचा आरोप आहे. त्यामुळे भारतीय डॉक्टरांनी हे निमंत्रण नाकारल्याचे समजते.