वॉशिंग्टन : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास - पंडित जसराज अमेरिका मृत्यू
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन, ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज
पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी भोपाळमध्ये झाला होता. जसराज हे लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांचे मोठेभाऊ पंडित मणिराम यांनी त्यांचा सांभाळ केला. लहान वयातच जसराज यांनी गाण्यावर प्रभुत्व मिळवले. भारतासह अमेरिका, कॅनडा येथे त्यांचे अनेक शिष्य आहेत.
पंडित जसराज यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंडित जसराज यांचे शिष्य हे सध्या नामांकित संगीतकार आहेत. पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियनने (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान सापडलेल्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचे नाव दिले होते.
Last Updated : Aug 17, 2020, 7:31 PM IST