लेह - लडाख स्काऊट रेजिमेंटच्या जवानाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याच्या तुकडीत इतर जवानांनाही अलिप्त ठेवण्यात आले आहे. इतर जवानांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने याबाबत माहिती दिली आहे.
लडाखमधील कोरोना बाधित जवानाच्या तुकडीतील इतर सहकारीही देखरेखीखाली - कोरोना विषाणू भारत
कोरोना बाधित जवानाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींवरही देखरेख ठेवण्यात येत आहे. सुट्टीवर असताना जवानाला त्याच्या वडिलांपासून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना बाधित जवानाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींवरही देखरेख ठेवण्यात येत आहे. सुट्टीवर असताना जवानाला त्याच्या वडिलांपासून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे वडिल नुकतेच इराणला गेले होते. ते भारतात 27 फेबृवारीला पोहोचले. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना लडाख येथील हर्ट फॉउंडेशन येथे 29 फेबृवारीपासून क्वारंटाईन (देखरेखीखाली) करण्यात आले होते. त्यांची चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
जवानही याच काळात म्हणजे २५ फेबृवारी ते १ मार्चपर्यंत सुट्टीवर गेला होता. त्यानंतर २ मार्चला पुन्हा कर्तव्यावर रूजू झाला. दरम्यान, वडील आजारी असताना त्याने त्यांची काळजी घेतली होती. ७ मार्चला जवानालाही क्वारंटाईन करण्यात आले. १६ मार्चला कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर एसएनएम या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानाचे संपूर्ण कुटुंबही एसएनएम या रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.