महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात दहशतवाद्यांचा खात्मा - चकमक

सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमधील केरन नियंत्रण रेषेजवळ पाच ते सात घुसखोरांना ठार केले आहे.

घुसखोर ठार

By

Published : Aug 3, 2019, 9:58 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमधील केरन नियंत्रण रेषेजवळ पाच ते सात घुसखोरांना ठार केले आहे. त्यांचे मृतदेह अद्याप मिळाले नसून भारतीय लष्कर आणि दहशतावद्यांमध्ये चकमक सुरूच आहे.


लष्कराने दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. घुसखोर गेल्या 36 तासांपासून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते, असे सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. काश्मीरमधील शांततेचा भंग करण्यासाठी आणि अमरनाथ यात्रेला लक्ष करण्यासाठी पाकिस्तान अंतकवाद्यांना मदत करीत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.


अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी आंतकवाद्यांना ठार मारण्यासाठी कंबर कसली आहे. लष्करी अधिकारी आणि पोलीस महासंचालकांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांना इशारा दिला होता. काश्मीरमधील दहशतवादात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असून पाकिस्तान कश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना आम्ही यश मिळू देणार नाही, असे लेफ्टनंट जनरल के. जे. एस धिल्लोन पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details