तिनसुकिया (आसाम) -भारतीय लष्कर आणि आसाम पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये 'नॅशनल सोशालिस्ट काऊंन्सिल ऑफ नागालँड'च्या (एनएससीएन) दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. रामपोंग हखून जॉनी आणि एसएस एसजीटी कोचुंग सानके अशी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी संशयितांना लेडो पोलीस ठाण्यात नेले आहे.
लष्करासह आसाम पोलिसांच्या संयुक्त टीमकडून 'एनएससीएन'च्या दोन कार्यकर्त्यांना अटक - आसाम
गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि आसाम पोलिसांची संयुक्त टीमकडून मोहीम आखली गेली. विद्ध्वंसाचा कट आखल्याचा तसेच खंडणी वसूल करण्याचे नियोजन करत असल्याचा ठपका संशयितांवर ठेवण्यात आला आहे.
भारतीय लष्करासह आसाम पोलिसांच्या संयुक्त टीमकडून 'एनएससीएन'च्या दोन कार्यकर्त्यांना अटक
गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि आसाम पोलिसांची संयुक्त टीमकडून मोहीम आखली गेली. विद्ध्वंसाचा कट आखल्याचा तसेच खंडणी वसूल करण्याचे नियोजन करत असल्याचा ठपका संशयितांवर ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी संबंधीत ठिकाणाहून परदेशी बनावटीची 9 मिमीची पिस्तुल, वन पॉईंट 22 पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे, दारूगोळा आणि 10 हजार रुपये रोख जप्त केले.