महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय अर्थव्यवस्था लवकर रुळावर येईल असे वाटत नाही, नोबेल विजेते बॅनर्जींनी व्यक्त केली चिंता

अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे.

अभिजीत बॅनर्जी

By

Published : Oct 14, 2019, 11:24 PM IST

कोलकाता -अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था डगमगली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल, असे वाटत नसल्याचे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.


नोबल पुरस्कार मिळाल्याचे माहित झाल्यानंतर मी ४० मिनिटं झोपलो. मला माहित होते, जर मी जागा राहिलो तर मला भरपूर फोन येतील. आतापर्यंत मी माझ्या आईशी बोलू शकलो नाही. त्यांच्याशी लवकच बोलेल. कधीच वाटले नव्हते की, मला इतक्या लवकर हा पुरस्कार मिळेल, असे त्यांनी सांगितले.


यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details