नवी दिल्ली - फ्रान्समधील भारतीय राफेल विमानाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. हे कृत्य कुणी केले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. हा प्रकार रविवारी रात्री झाला. यातून भारतासंबंधी महत्त्वाची माहिती चोरी करण्याचा प्रयत्न होता.
फ्रान्समधील भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न - Rafale
पॅरीस शहरातील एका भागात भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाचे कार्यालय आहे. येथील हार्ड डिस्क किंवा कोणतीही कागदपत्रे चोरीला गेलेली नाहीत. कार्यालय फोडण्याचा प्रयत्न का करण्यात आला? याविषयी तपास सुरु असल्याचे भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले.

हा हल्ला राफेलसंबंधीची माहिती चोरण्यासाठी केला गेला असेल. कारण, या कार्यालयात पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या नव्हत्या.
राफेल प्रकल्पाचा प्रमुख हा ग्रुप कॅप्टन-रँक ऑफिसर असतो. जो राफेल ३६ बाबतचे काम पाहतो. फ्रान्समधील भारतीय हवाईदलाने संरक्षण मंत्रालयाला याबाबत कळवले आहे. या प्रकरणी फ्रान्सचे पोलीस तपास करत आहेत.