महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वीस बँकेतील काळा पैसा बाहेर येणार; खातेधारकांची गोपनीय माहिती मिळणार भारताला

स्वीस बँकेत असणारा भारतीयांचा काळा पैसा आता उघड होणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून स्वीस बँकेने खातेधारकांची गोपनीय माहिती देण्याचे मान्य केले आहे.

काळा पैसा

By

Published : Sep 1, 2019, 10:13 AM IST

नवी दिल्ली - स्वीस बँकेमध्ये दडवून ठेवलेला भारतीयांचा काळा पैसा आता उघड होणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून स्वीस बँकेने खातेधारकांची गोपनीय माहिती देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे बेहिशेबी आणि गैरव्यवहार करून परदेशात पैसा लपवणाऱ्यांच्या मुसक्या सरकारला आवळता येणार आहेत.

हेही वाचा - पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नाशकात महिलेवर अत्याचार

२०१८ मधील स्वीस बँकेतील भारतीय खाते धारकांची माहिती आता मिळणार आहे. काळ्या पैशाविरोधातील लढाईतील हे महत्त्वाचं पाऊल आहे. स्वीस बँकेतील खातेधारकांची माहिती गुप्त राहण्याचे दिवस आता गेले आहेत, असे उत्पादन शुल्क विभागाने ट्विट केले आहे.

हेही वाचा - जाणून घ्या, जीडीपी घसरल्याने नेमका काय होतो आपल्या उत्पन्नावर परिणाम...

मारिओ लुशर यांच्या अध्यक्षतेखाली स्वीस बँकेचे शिष्ठमंडळ आणि महसूल सचिव अजय भूषण पांडे यांच्यामध्ये दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. दोन दिवस चाललेल्या बैठकीमध्ये बँकेतील खात्यांसदर्भातील माहितीची देवाणघेवाण कशी करायची याबाबत चर्चा सुरू होती. काही खटल्यामंध्ये भारताने बँकेकडे माहिती मागीतली होती, त्यावरही चर्चा झाली.

हेही वाचा - १ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस कपात होणार

'कॉमन रिपोर्टिंग स्टॅडर्ड'(सीएसआर) अंतर्गत स्वयंचलित पद्धतीने खातेधारकांची माहिती(एईओआय) स्वीस बँकेकडून भारताला मिळण्यास पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे.

काळ्या पैशाविरोधातील भारताच्या लढाईला यामुळे यश मिळाले आहे. मोदी सरकार २०१४ साली सत्तेमध्ये आल्याननंतर स्वीस बँकेतील खातेदारींची माहिती उघड करण्याचा पाठपुरावा करण्यात येत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details