नवी दिल्ली - लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी बदलत्या युद्ध तंत्रज्ञानावर लक्ष वेधत भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे सूतोवाच दिले आहेत. आम्ही लेझर शस्त्रे आणि 'ब्लॉक चैन' तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात लेझर आणि 'ब्लॉक चैन' तंत्रज्ञानाचा युद्धात वापर करणार - लष्कर प्रमुख
मागील काही दशकांपासून चीनला एकाही युद्धाचा अनुभव नाही. तरीही सातत्याने चीन लष्करी क्षमता दाखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून काही महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमध्ये चीन आघाडीवर असल्याचे वातावरण तयार झाले आहे, असे नरवणे म्हणाले.
ब्लॉक चैन तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धीमत्ता तसेच माहितीच्या देवाणघेवाणीवर आधारित युद्धाच्या नियोजनाचा समावेश आहे. २० व्या शतकातील मोठे रणगाडे आणि लढाऊ विमाने कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. युद्धाची परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून विचार करत आहोत. देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर लष्कराची क्षमता विकसित करत असल्याचे नरवणे म्हणाले.
नरवणे यांनी चीनच्या युद्ध क्षमतेवरही भाष्य केले. मागील काही दशकांपासून चीनला एकाही युद्धाचा अनुभव नाही. तरीही सातत्याने चीन लष्करी क्षमता दाखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून काही महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमध्ये चीन आघाडीवर असल्याचे वातावरण तयार झाले आहे.