जयपूर :राजस्थानमधील आणखी एका भाजप नेत्याने कोरोनावरुन मुक्ताफळे उधळली आहेत. खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जसकौर मीना यांनी राम मंदिर उभारताच कोरोना देशातून पळून जाईल, असे विधान केले.
भारतातील नागरिक हे दैवी शक्तींचे पूजन करतात आणि आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या तत्त्वांनुसार आचरण करतात. अयोध्येमधील राम मंदिर उभारले जाण्याची आपण सर्व बऱ्याच काळापासून वाट पाहत होतो. पाच ऑगस्टला मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. आपण सर्व दिवे लाऊन आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा करू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे या महान कार्यासाठी मोठे योगदान आहे. तसेच, देशाला लाभलेले ते महान नेते आहेत. त्यांनी लोकहितासाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आहेत. राम मंदिराची उभारणी ही त्यांच्यामुळेच शक्य झाली आहे, असे त्या म्हणाल्या.