नवी दिल्ली - सागरी भागावर राज्य करण्यासाठी भारतीय नौदल आता सज्ज झाले आहे. कारण, भारताकडे आता प्राणघातक असे 'सीहॉक हेलिकॉप्टर' असणार आहेत. हे जगातील सर्वात प्रगत असे समुद्री हेलिकॉप्टर आहेत, जे शत्रूच्या पाणबुड्यांची अवघ्या काही सेकंदातच शिकार करू शकते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्यावाहिल्या भारतीय दौऱ्यामध्ये, वॉशिंग्टन आणि दिल्लीमध्ये २.६ अब्ज डॉलर्सचा करार होण्याची शक्यता आहे. या कराराद्वारे अमेरिका भारताला असे बहु-भूमिका असलेले २४ 'एमएच-६० आर सीहॉक सागरी हेलिकॉप्टर' पुरवणार आहे.
या हेलिकॉप्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये असलेल्या एमके-४६ आणि एमके-५४ एअर लॉन्च टॉर्पेडोस. यामुळे अत्यंत कठिण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही कोणतीही मोहीम आरामात पार पाडण्याची क्षमता यांमध्ये आहे.