भुवनेश्वर -पाण्याखाली राहूनही शत्रूचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या 'के-४' या क्षेपणास्त्राची चाचणी येत्या शुक्रवारी पार पडेल. आंध्रप्रदेश जवळ समुद्रातील पाण्याखाली असलेल्या एका तळावरून हे क्षेपणास्त्र लाँच केले जाईल. याची खासियत अशी, की पाणबुड्यांमधून लाँच केल्यानंतर हे क्षेपणास्त्र ३,५०० किलोमीटर दूर असलेल्या शत्रूचाही खात्मा करू शकते.
पाण्याखालून शत्रूचा वेध घेणारे 'के ४' मिसाईल.. - डीआरडीओ
भारतीय बनावटीच्या पाणबुड्यांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागामार्फत (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र तयार केले गेले आहे. या पाणबुड्या भारताच्या 'अणु त्रिकूटा'चा मुख्य आधार असतील. पाण्याखाली राहूनही शत्रूचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या 'के-४' या क्षेपणास्त्राची चाचणी येत्या शुक्रवारी पार पडेल.
K-4 Nuclear missile
हेही वाचा : 'लँबॉर्गिनी', 'फरारी'पेक्षाही महाग आहे हा रेडा..