नवी दिल्ली- जगभरात कोरोनाचे थैमान पसरत चालले आहे. अशा वेळी जागतिक आरोग्य संस्थेने एकता चाचणीची हाक दिली आहे. यामध्ये भारतदेखील सहभागी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) 'एकता चाचणी'ची घोषणा केली आहे. यामध्ये ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनावर विविध उपचार करणार आहेत. यासाठी जगभरातील रुग्णांची यादृच्छिकरित्या निवड केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये भारतही सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयएमसीआर) दिली आहे.
डब्ल्यूएचओमार्फत भारतात ही चाचणी घेण्यासाठी डॉ. शीला गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. त्या आयएमसीआरच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये संशोधक आहेत.