बालासोर - पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवार शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी परीक्षण केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसान या क्षेपणास्त्रामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे. ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शौर्य क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती 800 किमी अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करून शकते. शौर्य मिसाइलच्या परीषणामुळे भारतीय संरक्षण यंत्रणा मजबूत झाली असून हे क्षेपणास्त्र वजनाने हलके व वापरास सोपे असे आहे.