नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या सोहळ्यात सामिल होणाऱया प्रमुख पाहुण्यांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाल आणि भूटानच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नाही.
मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याचे बिम्सटेकच्या सदस्य राष्ट्रांना निमंत्रण; पाकला वगळले - श्रीलंका
बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाल आणि भूटानच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.
भारताकडून २०१४ साली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, भारताकडून अद्याप पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आले नाही. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विजयाबद्दल मोदींना फोन केला होता. दोन्ही पंतप्रधानात दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवाद्यांविरोधात एकत्र लढण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत चर्चाही झाली होती.
भारताकडून बिम्सटेक यादीतील सर्व देशांना निमंत्रण देण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याऐवजी तेथील मंत्री उपस्थित राहणार आहेत. भुटानचे पंतप्रधान शेरिंग वांगचुक, म्यानमारचे राष्ट्रपती विन मिंत, नेपालचे पंतप्रधान के.पी ओली, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना, थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओ हजेरी लावणार आहेत. बिम्सटेक व्यतिरिक्त किर्गिस्तानचे राष्ट्रपती सोरोनबाय जेनेबकोव आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्राविन्द जगन्नाथ यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.