महाराष्ट्र

maharashtra

भारत-रशियाचा संयुक्त लष्करी सराव संपन्न

By

Published : Dec 19, 2019, 5:57 PM IST

लोहगाव येथील लष्करी विमनतळावर वायूदलाचा, उत्तर प्रदेशातील बाबीना येथे भूदलाचा आणि गोव्यात नौदलाचा सराव संपन्न झाला. वायूदलाच्या सरावादरम्यान भारत आणि रशियाच्या वैमानिकांनी लढाऊ विमान सुखोई 30 ची एकत्रित उड्डाणे केली.

लष्करी सराव संपन्न
लष्करी सराव संपन्न

पुणे -भारत आणि रशियन सैन्यदलांचा एकत्रित युद्धसराव भारतात पार पडला. यामध्ये तिन्ही दलाचे सैनिक सहभागी झाले होते. या संयुक्त युद्धसरावाला 'इंद्रशक्ती' असे नाव देण्यात आले.

भारत-रशिया संयुक्त युद्धसराव


लोहगाव येथील लष्करी विमनतळावर वायूदलाचा, उत्तर प्रदेशातील बाबीना येथे भूदलाचा आणि गोव्यात नौदलाचा सराव संपन्न झाला. वायूदलाच्या सरावादरम्यान भारत आणि रशियाच्या वैमानिकांनी लढाऊ विमान सुखोई 30 ची एकत्रित उड्डाणे केली. भारतात पहिल्यांदाच उभय देशाचा सराव झाला. 2017 ला रशियातील व्लादिवोस्तोकमध्ये या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - भारत-अमेरिका द्विस्तरीय चर्चेवर काश्मीर अन् #CAA आंदोलनांचे सावट

युध्दादरम्यान आपले हवाई क्षेत्र शत्रू राष्ट्रांच्या विमानापासून संरक्षित ठेवणे, रडारचा अभ्यास करणे, शत्रू राष्ट्रांच्या रडारपासून बचाव करत त्यांच्या हालचाली टिपणे, लक्षाचा अचूक भेद करणे या बाबींचा अभ्यास या सरावादरम्यान करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details