नवी दिल्ली - भारतामधील मुस्लिमांवर भाष्य केल्याबद्दल पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान खान यांना फटकारले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात इम्रान यांची टिप्पणी विचित्र असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी एकामागून एक ट्विट करत भारतावर टीका केली. भारतामध्ये कोरोना महामारीच्या संकटात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा इम्रान खान म्हणाले होते.
'पाकिस्तानने आपल्या देशातील अल्पसंख्याक समुदायाची चिंता करावी'
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात इम्रान यांची टिप्पणी विचित्र असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या नेतृत्त्वातर्फे 'विचित्र टिप्पण्या' केल्या जात आहेत. जगाचे लक्ष त्याच्या देशातील अंतर्गत समस्यांपासून दूर करणे हा त्यांचा हेतू आहे. कोरोनाविरोधात लढा देण्याएवजी ते शेजारी देशावर टीका करत आहेत. पाकिस्ताने आपल्या देशातील अल्पसंख्याक समुदायाची चिंता करणे गरजेचे आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाझींनी ज्यू लोकांविरूद्ध जे काही केले होते, तेच भारतातील मुस्लिम लोकांसोबत होत आहे, असे टि्वट पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते.