नवी दिल्ली : बुधवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्यांची, तसेच सर्वाधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची नोंद झाली. आज एका दिवसात ५६ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यानंतर देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ लाख ३९ हजार ५९९वर गेली आहे.
आज नोंद झालेल्या रुग्णांनंतर देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या सहा लाख ४३ हजार ९४८ आहे. जी एकूण रुग्णांच्या २७.६४ टक्के आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेने केलेल्या चांगल्या कामामुळे, देशातील कोरोना मृत्यूदर हा केवळ १.९८ टक्क्यांवर आला आहे, जो जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.