नवी दिल्ली -गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 19 हजार 906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरू असलेल्या 410 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. भारताने ५ लाख रुग्णांचा एकूण आकडा पार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 28 हजार 859 इतका झाला आहे. यापैकी 2 लाख 3 हजार 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशभरात 3 लाख 9 हजार 713 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 16 हजार 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 7 हजार 273 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 59 हजार 133 वर गेली आहे. यातील एकूण 67 हजार 615 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 84 हजार 245 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.