महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांत आढळले 15 हजार 968 कोरोनाबाधित ; तर 465 जणांचा बळी - देशात कोरोना रुग्ण

देशात 4 लाख 56 हजार 183 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 83 हजार 22 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 58 हजार 685 जण बरे झाले आहेत. तर, 14 हजार 476 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jun 24, 2020, 10:15 AM IST

नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 15 हजाराचा आकडा पार केला. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 15 हजार 968 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 465 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 4 लाख 56 हजार 183 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 83 हजार 22 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 58 हजार 685 जण बरे झाले आहेत. तर, 14 हजार 476 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 6 हजार 531 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 39 हजार 10 वर गेली आहे. यातील एकूण 62 हजार 848 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 69 हजार 631 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्लीमध्ये 66 हजार 602 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 हजार 988 रुग्ण सक्रिय आहेत. तर 39 हजार 313 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुजरात राज्यात 28 हजार 371 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 20 हजार 513 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 6 हजार 148 रुग्ण सक्रिय आहेत.

तामिळनाडूमध्ये 64 हजार 603 कोरोनाबाधित तर 833 जणांचा बळी गेला आहे. तसेच 35 हजार 339 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 28 हजार 431 जणांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details