महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासात देशात आढळले 14 हजार 516 कोरोनाबाधित; तर 375 जणांचा बळी - कोरोना अपडेट

देशात 3 लाख 95 हजार 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 68 हजार 269 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 जण बरे झाले आहेत. तर, 12 हजार 948 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jun 20, 2020, 11:01 AM IST

नवी दिल्ली -देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 14 हजाराचा आकडा पार केला. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखाच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 14 हजार 516 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 375 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 3 लाख 95 हजार 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 68 हजार 269 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 जण बरे झाले आहेत. तर, 12 हजार 948 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 5 हजार 893 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 24 हजार 331 वर गेली आहे. यातील एकूण 55 हजार 665 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 62 हजार 773 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्लीमध्ये 53 हजार 116 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 27 हजार 512 रुग्ण सक्रिय आहेत. तर 23 हजार 569 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुजरात राज्यात 26 हजार 141 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 18 हजार 159 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 6 हजार 364 रुग्ण सक्रिय आहेत.

तामिळनाडूमध्ये 54 हजार 449 कोरोनाबाधित तर 666 जणांचा बळी गेला आहे. तसेच 30 हजार 271 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 23 हजार 512 जणांवर उपचार सुरू आहेत.

अंदमान- निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझारोम, नागालँड, सिक्किम आणि दमन आणि दिव, दादरा आणि नगर हवेली येथे एकही कोरोनाबाधिताचा अद्याप मृत्यू झालेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details