नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या पुढच्या टप्प्यातील चर्चेसाठी भारताकडून पाकिस्तानला येत्या 11-14 जुलै या दिवशी बैठक घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. कर्तारपूर कॉरिडॉरची आधारभूत संरचना , इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण आणि मसुदा करारावार चर्चा करण्यासाठी भारताने हा प्रस्ताव मांडला आहे.
कर्तारपूर कॉरिडॉरच्या चर्चेसाठी भारताकडून पाकिस्तानला प्रस्ताव - panjab
कर्तारपूर कॉरिडॉरच्या पुढच्या टप्प्यातील चर्चेसाठी भारताकडून पाकिस्तानला 11-14 जुलै या दिवशी बैठक घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. कर्तारपूर कॉरिडॉरची आधारभूत संरचना , इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण आणि मसुदा करारावार चर्चा करण्यासाठी भारताने हा प्रस्ताव मांडला आहे.
पंजाबच्या गुरदासपूरमधून सीमेपलीकडे असलेल्या कर्तारपूर साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गिका खुली करण्याबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार आहे.
यापुर्वीच्या चर्चेत भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांना पाकिस्तानातील शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारताने केली होती. मात्र पाकिस्ताने याला नकार देत फक्त तीर्थयात्रेमध्ये परवानगी देण्यात येईल असे सांगितले होते.
याचबरोबर कर्तारपूरमधील ऐतिहासिक शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी पाकिस्तानने दररोज भारतातील पाच हजार यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी भारताने केली होती.