महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत कोरोनाचे जागतिक केंद्र बनण्याच्या उंबरठ्यावर

भारतातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ब्राझील आणि अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. भारतात दर 24 दिवसांत कोरोना रुग्ण दुप्पट होतात, तर ब्राझीलमध्ये 47 दिवसांत व अमेरिकेत 65 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होताना दिसत आहे. म्हणजे भारताच्या तुलनेत या दोन्ही देशांमधील कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अशाप्रकारे जर भारतात रुग्णसंख्या वाढतच गेली तर हे भारतासाठी चिंतेची बाब आहे.

india-inches-closer-to-become-global-hub-of-coronavirus
भारत कोरोनाचे जागतिक केंद्र बनण्याच्या उंबरठ्यावर

By

Published : Aug 17, 2020, 9:15 AM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले आहे. मागील सात दिवसांतील सरासरीच्या बघता या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अधिक कोरोना अधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या कोरोनाव्हायरस रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्ण आढळण्याची साप्ताहिक सरासरी 11 ऑगस्टपर्यंत भारतात 60,000 इतकी होती. अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेत भारताची ही सरासरी अधिक आहे.

भारतातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ब्राझील आणि अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. भारतात दर 24 दिवसांत कोरोना रुग्ण दुप्पट होतात तर ब्राझीलमध्ये 47 दिवसांत व अमेरिकेत 65 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होताना दिसत आहे. म्हणजे भारताच्या तुलनेत या दोन्ही देशांमधील कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अशाप्रकारे जर भारतात रुग्णसंख्या वाढतच गेली तर हे भारतासाठी चिंतेची बाब आहे.

दरम्यान, कोरोना रुग्ण आढळण्याचा कालवधी दुप्पट करण्यात अमेरिकेला यश आले आहे. परंतु, आतापर्यंत भारताला रुग्ण दरवाढ रोखण्यास यश आलेले आहे. आता भारतही अमेरिकेप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत असून अमेरिकेप्रमाणे, भारतही कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, 22जुलैला अमेरिकेने कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठला होता. या दिवशी रुग्णवाढीची आठवड्याची सरासरी 67,000 इतकी होती. भारतातील सध्याची परिस्थिती बघता बहुधा भारत हा विक्रम पार करेल अशी चिन्हे दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या वृत्तानुसार ब्राझीलचा मृत्यूदर स्थिर असून, अमेरिकेचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हळूहळू कमी होत आहे. तर , भारताचा मृत्यूदर या दोघांपेक्षा कमी आहे. मृत्यूच्या संख्येबाबत भारत आणि अमेरिका अजूनही ब्राझीलच्या मागे आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत भारतातील कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 49980 इतकी आहे. ती केवळ २०,००० च्या तुलनेत कमी होती. तर, या स्थितीत, अमेरिका,ब्राझील आणि मेक्सिकोने 50,000 मृत्यूचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूची आकडेवारीचा पाहता, भारत कोरोना हब बनत आहे, असे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details