नवी दिल्ली - भारताने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खूप कठोर प्रयत्न केले, आणि मोठ्या प्रमाणात प्रसार रोखण्यात यशही आले आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (बुधवार) म्हटले. कोविंद यांनी आज जॉर्जियाचे राष्ट्रपती सलोमी झोर्बीचिविली यांच्याशी फोनवर चर्चा केली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत आघाडीवर असून जगभर भारताने आपले प्रयत्न केले. दीडशेपेक्षा जास्त देशांना भारताने वैद्यकीय मदत देऊ केली. स्वत: भारत कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला, असे त्यांनी झोर्बीचिविली यांना सांगितले. राष्ट्रपती भवनने अधिकृत पत्रक काढून याबाबत माहिती दिली.