नवी दिल्ली - चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभारत थैमान घातले आहे. आज भारतातमधील कोरोना रुग्णांनी 70 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 74 हजार 383 रुग्णांची भर पडली. तसेच 918 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. राज्यनिहाय आकेडवारी पाहता, सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दरम्यान नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असली तरी रिकव्हरी रेट सरासरीपेक्षाही वाढला आहे.
देशातील एकूण रुग्णांची संख्या 70 लाख 53 हजार 807 वर पोहचली आहे. तर 8 लाख 67 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 60 लाख 77 हजार 977 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच 1 लाख 8 हजार 334 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या 2 लाख 21 हजार 615 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 40 हजार 40 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 10 हजार 187 आणि कर्नाटकात 9 हजार 891 जणांचा मृत्यू झाला आहे.