नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 लाख 57 हजार 132 वर पोहचला आहे. यात 9 लाख 7 हजार 883 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर, 57 लाख 44 हजार 693 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 1 लाख 4 हजार 555 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 72 हजार 49 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 986 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात सध्या 24 लाख 7 हजार 468 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 38 हजार 717 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 9 हजार 917 आणि कर्नाटकात 9 हजार 461 जणांचा मृत्यू झाला आहे.