महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचे देशभरात थैमान, रुग्णांचा आकडा एक लाख पार - india corsses one lakh corona patient

सध्या देशात 56 हजार 316 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 36 हजार 824 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एक रुग्ण देशातून बाहेर गेला आहे. देशातील तीन राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 33 हजार 53जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये कोरोनाचे 11 हजार 379 रुग्ण आहेत. तर, तमिळनाडूमध्ये 11 हजार 224 रुग्ण आहेत.

कोरोनाचे देशभरात थैमान
कोरोनाचे देशभरात थैमान

By

Published : May 19, 2020, 4:46 PM IST

Updated : May 19, 2020, 4:56 PM IST

नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या एक लाख पार झाली आहे.तर,या महामारीने आतापर्यंत 3029 रुग्णांचा बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली आहे.

सध्या देशात 56 हजार 316 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 36 हजार 824 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एक रुग्ण देशातून बाहेर गेला आहे. देशातील तीन राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 33 हजार 53 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये कोरोनाचे 11 हजार 379 रुग्ण आहेत. तर, तमिळनाडूमध्ये 11 हजार 224 रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 1 हजार 198 आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 977 असून मृतांची संख्या 248 इतकी आहे. पश्चिम बंगालमध्ये मृतांचा आकडा 238 आहे. तर, एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 677 आहे.

उत्तर प्रदेशात 104 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णांची संख्या 4259 आहे. तेलंगणात 1151 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, 34 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये 5 हजार 202 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पंजाबमध्ये 1 हजार 964 तर दिल्लीत 10 हजार 54 कोरोनाचे रुग्ण असून 160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : May 19, 2020, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details