हैदराबाद - देशामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे. तर आतापर्यंत यामुळे ९ जणांचा बळी गेला आहे. या ५६२ पैकी ५१२ 'अॅक्टिव्ह केसेस' असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच, ४० रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ वर, तर जगात १९५ देश कोरोनाने प्रभावित - कोरोना
देशामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे.
कोरोना विषाणूमुळे जगातील १९५ देश प्रभावित झाले आहेत. जगातील वेग-वेगळ्या देशांमध्ये १८ हजार ८९१ लोकांचा जीव गेला आहे. तर ४ लाखांपेक्षाही जास्त लोक बाधित झाले आहेत. तर १ लाख ७ हजार लोक कोरोनाविषाणूमधून बरे झाले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार चीनबाहेर वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये इटलीमध्ये ७४३ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंगळवारपर्यंत देशात कोरोनाचे ५६२ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले