लष्कर दिन: सरसेनाध्यक्षांसह तिन्ही सेनादल प्रमुखांनी युद्ध स्मारकाला वाहिली आदरांजली
दिल्लीत भारताचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहीली.
नवी दिल्ली - आजचा दिवस भारतीय लष्करासाठी महत्त्वाचा आहे. १५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने दिल्लीत भारताचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहिली.
दिल्लीतील आर्मी परेड ग्राऊंड येथे आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख नरवणे यांनी जवानांना पदक देऊन गौरव केला. यावेळी सरसेनाध्यक्षांना मानवंदना देण्यात आली.