नवी दिल्ली - देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांनी कश्मीर, दिल्ली, मुंबईच्या मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे.देशभरातील हाच उत्साह छायाचित्रांच्या माध्यमातून पाहुया…
देशभरात बकरी ईदचा उत्साह ; नरेंद्र मोदींनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्व आहे.मुस्लमांच्या कालगणेनुसार अरबी महिन्याच्या दहाव्या दिवशी ‘बकरी ईद’ साजरी केली जाते. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. दरम्यान, बकरी ईदच्या पाश्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.