महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आधुनिक प्रबोधनाचे नवे मार्ग शोधताना : गांधी आणि टागोर

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, आपण गांधीजी आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या लेखामध्ये आपण गांधीजी आणि टागोर यांच्या विचारांमधील साम्य आणि भेदांबद्दल जाणून घेणार आहोत. हा लेख हरिश्चंद्रपूर कॉलेज, मालदा मधील प्राध्यापक अर्णब चॅटर्जी यांनी लिहिला आहे.

Gandhi and Tagore

By

Published : Sep 6, 2019, 6:08 AM IST

कोलकाता - आधुनिक प्रबोधनासचे विकासाशी जोडले जाणे, त्यामधील सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक संघर्ष या सर्व गोष्टींमुळे भारतातील विद्वानांमध्ये बराच वादविवाद घडून आला. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी आधुनिक प्रबोधनाच्या युरोसेंट्रीजमला गांधी आणि टागोरांनी विरोध केला. गांधी आणि टागोर यांची चरख्याबाबत मतांतरे होती. मात्र, काही बाबतीत त्यांची मते अगदी सारखी होती. टागोरांची स्वदेशी स्वमाज ही संकल्पना गांधींच्या स्वराज्याच्या संकल्पनेशी मिळती जुळती होती. मात्र, त्यांची राष्ट्रवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दलची मते अगदी भिन्न होती.

हेही वाचा : संघर्षाला तोंड देऊन शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग : गांधीवाद

टागोरांचे राष्ट्रवादाबद्दल अगदी कट्टर विचार होते. १९१७ मध्ये आपल्या भाषणांमधून त्यांनी राष्ट्र-राज्याच्या पाश्चात्य कल्पनांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी जाणीवपूर्वक अतिरेकी राष्ट्रवादापासून एक सुरक्षित अंतर राखले आणि देशभक्तीच्या आश्रयाखाली, राष्ट्रवादाच्या विध्वंसक बाबींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला. टागोरांच्या 'मुक्तधारा' मध्ये जरी गांधींच्या असहकार चळवळीची प्रशंसा केली गेली असली तरी, त्यांनी कधीही असहकार चळवळ आणि चरख्याला समर्थन दिले नाही. गांधींनी विदेशी वस्तूंचा पूर्णपणे त्याग केला. त्यांच्यासाठी खादी ही केवळ पाश्चात्य आधुनिकतेला सामोरे जाण्याची प्रतिकात्मक जागा नव्हती तर विकेंद्रिततेच्या राजकीय संदेशाने भरलेली एक व्यंगचित्र होती. गांधीजींनी हळूहळू स्वदेशीचा प्रसार करत, युरोपीय गोष्टींना स्वीकारणे पूर्णपणे बंद केले. मात्र, आधुनिकतेवरील प्रबोधनाशी टागोर यांचे संवादात्मक संज्ञापन होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात युरोपियन आधुनिकतेला मान्यता देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : लखनऊच्या जनाना पार्कशी जुळल्या आहेत गांधीजींच्या अनेक आठवणी

खेड्यांच्या विकासानेच देशाचा विकास शक्य आहे या विचारावर गांधी आणि टागोर या दोघांनाही ठाम विश्वास होता. गांधीजींनी ग्रामीण विकासाची सुरुवात चंपारण (१९१७), सेवाग्राम (१९२०) आणि वर्ध्यातून (१९३८) केला. टागोर यांनाही त्यांच्या श्रीनिकेतन संकल्पनेवर आधारीत असा खेड्यांचा विकास करायचा होता. पाश्चात्य देशांमधील जबरदस्तीच्या आणि नियमनशील स्वरूपावर टीका करताना टागोरांनी स्वदेशी स्वमाज ही संकल्पना मांडली, जी गांधीजींच्या हिंद स्वराज या संकल्पनेशी मिळतीजुळती होती. गांधी आणि टागोरांनी फक्त आत्मज्ञानाच्या आधुनिक प्रतिमेला आव्हान नाही दिले, तर स्वराज आणि स्वदेशी स्वमाज या त्यांच्या संकल्पनांतून त्याला पर्यायसुद्धा दिले. या दोघांनीही सामुदायिक जीवनात परस्पर सहकार्यावर भर दिला जिथे स्वावलंबन आणि नैतिक लवचिकपणा अस्तित्वात आहे.
स्वमाजाची संकल्पना ही सर्वांचा समावेश आणि सुसंवादावर आधारित आहे. टागोर यांनी आत्मज्ञानाच्या ज्ञानशास्त्रामध्ये आणखी एक आयाम जोडला. ते म्हणत, स्वमाजाला भावना आणि आकांक्षांची गरज आहेच, मात्र त्यासोबत अनुभवात्मक संशोधन आणि तर्कशुद्द विचारांचीही तेवढीच गरज आहे.

हेही वाचा : गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...

ABOUT THE AUTHOR

...view details