महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये अत्याचारास विरोध केल्याने चिमुरडीची हत्या

वसतीगृह चालकाने शेजारी असलेल्या घरातील ९ वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुरडीने विरोध करताच तिची हत्या करण्यात आली. मात्र, चिमुरडीवर बलात्कार झाला की नाही? हे अजून सिद्ध झालेले नाही.

दिल्लीमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱया नराधमाने चिमुरडीची केली हत्या

By

Published : Jul 22, 2019, 12:03 AM IST

दिल्ली -वसतीगृह चालकाने शेजारी असलेल्या घरातील ९ वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुरडीने विरोध करताच तिची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील शकरपूर भागात घडली. मात्र, चिमुरडीवर बलात्कार झाला की नाही? हे अजून सिद्ध झालेले नाही.

आरोपीने मृत पिडीतेला घेऊन नेताना घटना झाली सीसीटीव्हीत कैद

आरोपीचे नाव वसीम अहमद (२५) असून तो वसतीगृह चालक म्हणून काम करत होता. त्या वसतीगृहात ३० ते ३५ तरुण राहत होते. पीडित कुटुंब त्याच इमारतीच्या तळघरातील खोलीत राहत असून मुलीचे आई-वडील वसतीगृहात घरकाम म्हणून करत होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता पीडित मुलीची आई वरच्या मजल्यावर काम करत होती. तिचे वडील बाहेरुन घरी आले तर, त्यांना मुलगी मृतावस्थेत पडलेली दिसली. मुलीला रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विशेष म्हणजे आरोपीने मृत पीडितेला हातात घेऊन रुग्णालयात घेऊन जातानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details