इस्लामाबाद -भारताने आजपर्यंत कधीच अण्वस्त्राचा वापर केला नाही. मात्र, भविष्यात काय घडेल हे परिस्थितीवर अवलंबून आहे, असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. यावर फॅसिस्ट आणि हिंदू वर्चस्ववादी सरकारच्या नियंत्रणाखाली भारताचा अणवस्रांचा साठा सुरक्षित आहे का? याचा संयुक्त राष्ट्राने गंभीरपणे विचार करावा, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
भारत एक कट्टर हिंदू विचारधारा असलेल्या सरकारच्या नेतृत्वाखाली देश आहे. ज्याप्रमाणे जर्मनी ही नाझींच्या नेतृत्वाखाली होती. गेल्या दोन आठवड्यापासून काश्मीरी नरजकैदेमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्राने आपले पर्यवेक्षक तिथे पाठवून तिथली परिस्थिती पाहावी, असे म्हटले आहे. हिंदू वर्चस्ववादी सरकारच्या नियंत्रणाखाली भारताचा अणवस्रांचा साठा सुरक्षित आहे का? या गोष्टीचा संयुक्त राष्ट्राने गंभीरपणे विचार करावा, हा मुद्दा केवळ एका राष्ट्राचा नसून त्याचा परिणाम जगावरही होईल, असे इम्रान खान यांनी टि्वट करून म्हटले आहे.