हैदराबाद - कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी देशभर लागू केलेला लॉकडाऊन घटनाबाह्य असल्याचे खासदार आणि एमआयएम पक्षाने नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाल आहेत. लॉकडाऊनवर तेलगांणाचे मुख्यमंत्री शांत का आहेत? असा सवालही त्यांनी केली आहे.
'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचा आजार कायद्यानुसार भारत सरकार देशभर लॉकडाऊन घोषित करू शकत नाही. हे संघराज्याच्या विरोधात आहे. हा विषय राज्यसूचीतील आहे, मला कळत नाही, राज्य सरकारे यावर शांत का आहेत'? असे ओवैसी ऑनलाईन बैठकीत म्हणाले. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन ओवैसी यांनी केले. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. क्वारंटाईन होण्यास घाबरू नका. हे तुमच्या फायद्यासाठीच आहे. कोरोना कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. क्वारंटाईनमध्ये तुम्हाला ८ ते १० दिवस एकातंवासात रहावे लागेल, पण सर्वजण सुरक्षित राहतील, असे ते म्हणाले.
नागरिकांवर लक्ष द्या महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांवर लक्ष केंद्रीत करावे. नागरिकांनीही सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळावे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन औवेसी यांनी नागरिकांना केले.