लखनऊ -दर महिन्याच्या एक तारीखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. तसेच काही बँकांनी आजपासून मिनिमम बँँलेंस न ठेवल्ययास दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर अनलॉक-3 चे नवीन नियमावली लागू झाले आहेत. याचबरोबर अतिरिक्त बचत खात्यावरील व्याज दर, ईपीएफमधील योगदान, सुकन्या समृद्धी योजना, दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी आणि ई-कॉमर्स कंपनीच्या नियमांचा समावेश आहे.
ईपीएफ हिस्सा -
सरकारने मालक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना काळात दिलासा दिला होता. यावेळी त्यांच्या योगदानात मे, जून, जुलै या तीन महिन्यांत ४ टक्के कपात केली होती. त्याची मुदत आज संपत आहे. यामुळे मालक आणि कर्मचाऱ्यांना पूर्वी प्रमाणे हिस्सा भरावा लागणार आहे.
एलपीजीगॅसच्या किमतीत होणार बदल -
दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. मागील 2 महिन्यात कंपनी किमतीत वाढ करत आहे.
आजपासून लागू होणार अनलॉक-03
देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या दरम्यान केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करत आहे. आज 1 तारीखेपासून अनलॉक-03 सुरू झाले आहे. गृह मंत्रालयने याचे दिशा-निर्देश जारी केले आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेत नाही मिळणार सूट -