चंदीगड- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून काही उद्योगांना सुरू होण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही अटी, शर्थींवर सरकारने ही परवानगी दिली आहे. त्यानुसार काही ठिकाणी उद्याग सुरू झाले आहेत. मात्र, आशियातील सर्वात मोठे मोटार मार्केट समजले जाणारे मनीमाजरा येथील मोटर मार्केट हे बंद आहे. त्यामुळे, या मार्केटमध्ये काम करणारा मजूर वर्ग बेरोजगार झाला आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंदीगड प्रशासनाने मोटर मार्केटला उघडण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे मार्केट बंद आहे. यामुळे शोरूम मालकांना करोडो रुपयांचा घटा सहन करावा लागत असून मोटार कामगारही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने काही मोटर कामगारांशी चर्चा केली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून दुकाने बंद आहेत. पहिले १० ते १२ हजार रुपये महिन्याचे काम मिळत होते, मात्र आता लॉकडाऊनमुळे उधारीवर उदरनिर्वाह होत असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे.