महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जशास तसे! 'पाकिस्ताने हवाई मार्ग बंद केलाय तर भारताने समुद्री मार्ग बंद करावा'

पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. तर भारतानेही कराची बंदराकडे जाणारा अरब समुद्री मार्ग ( ज्याचे नाव बदलणे गरजेचे आहे) बंद करायला हवा, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी

By

Published : Aug 29, 2019, 2:48 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भारतानेही समुद्री मार्ग बंद करून पाकिस्तानच्या कारवाईला उत्तर द्यावे, असा सल्ला राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.


'नमो सरकारला माझी विनंती आहे. जर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. तर भारतानेही कराची बंदराकडे जाणारा अरब समुद्री मार्ग ( ज्याचे नाव बदलने गरजेचे आहे) बंद करायला हवा, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


8 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत कराची हवाई हद्दीतून सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे. 'पाकिस्तानी पंतप्रधान त्यांच्या संपूर्ण हवाई हद्दीतील प्रवास भारतासाठी बंद करण्याच्या विचारात आहेत. अफगाणिस्तानशी व्यापार करण्यासाठी भारताला पाकच्या हवाई हद्दीचा वापर करावा लागतो. याविषयी निर्णय घेण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात आहे,' असे ट्विट पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी केले होते.


याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला पोहोचला होता. त्यावेळीही भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने हवाई हद्द बंदी लागू केली होती. ती बंदी मागील महिन्यात उठवण्यात आली होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details