महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हवाई दलाच्या तेजस विमानाची इंधनाची टाकी शेतात पडली - fuel tank

या घटनेनंतर सुलुर विमानतळावर हे विमान यशस्वीरीत्या उतरवण्यात आले. या घटनेत कोणतेही अन्य नुकसान झाले नाही. भारतीय वायु सेनेने घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

इंधनाची टाकी

By

Published : Jul 2, 2019, 11:58 PM IST

कोईम्बतूर - भारतीय वायू सेनेच्या स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ जेट विमानाची इंधन टाकी मंगळवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शेतात पडली. विमान उड्डाण घेत असताना हा प्रकार घडला.

या घटनेनंतर सुलुर विमानतळावर हे विमान यशस्वीरीत्या उतरवण्यात आले. या घटनेत कोणतेही अन्य नुकसान झाले नाही. भारतीय वायु सेनेने घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

या इंधन टाकीची क्षमता १२०० लिटर आहे. ही टाकी पडल्यामुळे शेतात तीन फुटाचा खड्डा पडला. घटनास्थळी थोड्या प्रमाणात आग देखील लागली होती. ती लगेच विझवण्यात आली. विमानाच्या इंधनाची टाकी कोसळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने ती टळली. तेजस एक हलके लढाऊ विमान आहे. लढाऊ विमानांप्रमाणेच त्याचेही आयुर्मान किमान ३० वर्षे असते.

ABOUT THE AUTHOR

...view details