महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IAF विंग कमांडर अभिनंदन लवकरच कॉकपिटमध्ये परतणार

अभिनंदन सध्या सैन्याच्या रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. ते लवकरात लवकर ड्युटीवर परततील, यादृष्टीने इलाज सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून मानसिक त्रास देण्यात आल्यानंतरही अभिनंदन यांचे धैर्य मजबूत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

IAF विंग कमांडर अभिनंदन

By

Published : Mar 4, 2019, 9:12 AM IST

नवी दिल्ली - विंग कमांडर अभिनंदन लवकरात लवकर कॉकपिटमध्ये वैमानिकाच्या जागेवर परतणार आहेत. पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणाऱ्याअभिनंदन यांनी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि डॉक्टरांकडे स्वतःहून ही मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांच्यावर २ दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

मानसिक उपचारांदरम्यान, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना मानसिक त्रास दिल्याचे समोर आले होते. तसेच, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकारावरून पाकिस्तानने आपल्या वैमानिकाला अयोग्य वागणूक दिल्याचा आक्षेप भारताने घेतला होता. मात्र, अभिनंदन यांनी धीराने सर्व प्रसंगाचा सामना केला. संरक्षम मंत्री निर्मला सीतारामन यांनीही अभिनंदन यांची त्यांच्या पत्नी, बहीण आणि मुलासह भेट घेतली होती. सीतारामन यांनी त्यांची विचारपूस केली होती.

अभिनंदन सध्या सैन्याच्या रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. ते लवकरात लवकर ड्युटीवर परततील, यादृष्टीने इलाज सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून मानसिक त्रास देण्यात आल्यानंतरही अभिनंदन यांचे धैर्य मजबूत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

अभिनंदन यांनी पकडले गेल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीचा धीराने सामना केला होता. तसेच, त्यांच्या शालीनतेचेही नेत्यांकडून, माजी सैनिक तसेच, युद्धसंबंधी विश्लेषकांकडून कौतुक केले जात असल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details