रामपूर - आझम खान यांनी आपण अभिनेत्री आणि भाजप अभिनेत्री जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे सोमवारी म्हटले आहे. जया प्रदा या खान यांच्याविरोधात रामपूर येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. खान यांनी येथे झालेल्या निवडणूक समाजवादी पक्षाच्या प्रचार सभेत जया प्रदा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान खान यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
जया प्रदांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही; दोषी सापडलो, तर उमेदवारी मागे घेईन- आझम खान - prove
आझम खान यांनी आक्षेपार्ह वक्तव्य रविवारी प्रचार सभेत केले होते. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी मी कोणाचेही नाव घेतले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. खान यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
'मी तिला (जया प्रदा) रामपूरला आणले. मी कोणालाही तिच्या शरीराला स्पर्श करू दिला नाही, याचे तुम्हीही साक्षीदार आहात. तिचा खरा चेहरा ओळखण्यात तुमची १७ वर्षे निघून गेली. मात्र, १७ दिवसांतच मला माहिती झाले की, ती खाकी ..... ' असे अत्यंत खालच्या पातळीचे आक्षेपार्ह वक्तव्य खान यांनी रविवारी प्रचार सभेत केले होते. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी मी कोणाचेही नाव घेतले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.
'मी दोषी सापडलो, तर आताच्या निवडणुकीतील उमेदवारी मागे घेईन,' असे आझम खान यांनी म्हटले आहे. आरएसएसच्या गणवेशामध्येही खाकी रंगाचा समावेश आहे. त्यांच्या या विधानावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.