नवी दिल्ली- बनावट ईमेलपासून सावधान राहण्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाने करदात्यांना दिला आहे. बनावट ई-मेलद्वारे पैसे परत करण्याचे (रिफंड) आश्वासन काहीजण देत आहेत. मात्र, ह्या लिंक खोट्या असून याद्वारे फसवणूक होईल, असे उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.
बनावट ईमेलपासून सावधान..! उत्पादन शुल्क विभागाचा करदात्यांना इशारा
बनावट ईमेलपासून सावधान राहण्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाने करदात्यांना दिला आहे.
हे बनावट मेल असून उत्पादन शुल्क विभागाने पाठविलेले नाहीत. त्यामुळे अशा खोट्या माहितीपासून सावधान व्हा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. ८ एप्रिल ते २० एप्रिलच्या दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने १४ लाख नागरिकांना पैसे माघारी (रिफंड) केले आहेत. एकूण ९ हजार कोटी रक्कम करदात्यांना माघारी दिली आहे. यामध्ये उद्योग, मालमत्ताधारक, स्टार्ट अप्स, वैयक्तीक करदाते, कंपन्या, लघु आणि मध्यम उद्योगांनी ही रक्कम माघारी देण्यात आली आहे.
परताव्याची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतील, असे अर्थमंत्रालयाने आठ एप्रिलला जाहीर केले आहे. ५ लाखांपर्यंतची प्रकरणे हाताळण्यात येणार आहेत. याचा फायदा १४ लाख करदात्यांना होणार आहे. कंपन्या, उद्योग आणि करदात्यांना या कठीण काळात त्यामुळे मदत होणार आहे.