हैदराबाद- हवालासाठी वापरण्यात येणारे १ कोटी ४० लाख २० हजार रुपये हैदराबाद पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर, २ कार आणि ५ मोबाईल घटनास्थळावरुन जप्त केले आहेत.
हैदराबाद पोलिसांकडून हवालाप्रकरणात ४ जणांना अटक; कोटींची रक्कम जप्त
हवालासाठी वापरण्यात येणारे १ कोटी ४० लाख २० हजार रुपये हैदराबाद पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडे रकमेसंबंधातील कागदपत्रे मागितली. परंतु, त्यांच्याकडे याबाबत कोणतेही कागदपत्रे नव्हती.
पोलिसांनी आरोपींकडे रकमेसंबंधातील कागदपत्रे मागितली. परंतु, त्यांच्याकडे याबाबत कोणतेही कागदपत्रे नव्हती. तसेच या रकमेसबंधी काय करणार असल्याचेही त्यांना सांगण्यात आले नाही. याप्रकरणात कंत्राटदार पी मुरली (३३), अकाउंटंट एस राजेश (३४), दातांचा डॉक्टर के जगदीश (३४) आणि कारचालक पी श्रीनू (४०) यांना अटक केली आहे.
हैदराबाद शहर पोलिसांनी युसुफगुडा येथून हवालासाठी वापरण्यात आलेली कार आणि रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली रक्कम आणि कार आयकर विभागाकडे पुढील तपासासाठी सोपवण्यात आली आहे.